अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन २०१९

आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की २०१९ चे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन सिडनीमध्ये होत आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांमधील मराठी माणसांनी एकत्र येऊन मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपावी तसेच वृद्धिंगत करावी हा संमेलनाचा मुख्य उद्देश. कार्यक्रम सादर करण्यासाठी भारतातून येणारे नामावंत कलाकार व त्याचबरोबर स्थानिक कलाकार आपला कलाविष्कार नृत्य, नाट्य, गायन, वादन अशा विविध माध्यमातून सादर करणार आहेत.

मुख्य कार्यक्रमाच्या संयोजनासाठी व त्याआधीची निरनिराळ्या आघाडीवरील तयारीसाठी एक समितीही नेमली आहे जिचे स्वयंसेवक सतत कार्यरत आहेत. दर्जेदार कार्यक्रम, सुसंबध्द व्यवस्थापन,उत्तम भोजन, सुसुत्रता, सादरीकरणाचा विषय व मांडणी ह्याच्या चोखंदळ निवडीसाठी सध्या जय्यत तयारी सुरु आहे.

अशा ह्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाला तुम्हाला आमचे आग्रहाचे आमंत्रण !

कार्यक्रमाचे स्थळ – Whitlam Leisure Centre, Liverpool, 90 Memorial Ave, Liverpool NSW 2170; Australia वेळ व इतर माहिती (Please click here)

तर मंडळी, भेटुया १९ ते २१ एप्रिल २०१९ ला.

Program Attractions

Our Sponsors

Our Digital Partners