AAMS 2019

थोडंसं आमच्या बाबत....

मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरेटेड (MASI) ही एक non-profit संस्था आहे जी भारतातून ऑस्ट्रेलिया मध्ये New South Wales आणि ACT ह्या प्रांतात स्थायिक झालेल्या मराठी संस्कृतीत जन्मलेल्या लोकांनी ३० वर्षांपूर्वी स्थापन केली. मूळ उद्देश हाच कि इथे ऑस्ट्रेलियात सुद्धा ही संस्कृती जपावी, जोपासावी तसेच वृद्धिंगत करावी जेणे करून पुढील येणाऱ्या पिढयांना हाच वारसा आम्ही देऊ शकू व मराठी इतिहासाशी, भाषेशी, कलेशी, वाङ्मयाशी तसेच मराठी पाककलेशी त्यांची नाळ जोडू शकू. संगीत, नृत्य, नाटक, वाङ्मय इत्यादी विविध कार्यक्रमाद्वारे हा सांस्कृतिक वारसा MASI ने अनेक वर्षे अविश्रांत सुरु ठेवला आहे.

हे झाले New South Wales व ACT पुरते. परंतु, संपूर्ण ऑस्ट्रेलियातल्या मराठी लोकांना एकत्र आणण्यासाठी दर तीन वर्षांनी एक मोठे अधिवेशन भरवले जाते. उद्देश हाच कि संपूर्ण ऑस्ट्रेलियामधील मराठी लोकांनी आपली संस्कृती साजरी करण्यासाठी एकत्र यावं, त्यांनी गाठी-भेटी व नवीन परिचय करावेत तसेच विचारांच्या आदान -प्रदानांद्वारे मराठी संस्कृतीची अशीच पुढे वाटचाल करत राहावं.

MASI च्या छत्राखाली ऑस्ट्रेलियातले पुढचे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संम्मेलन होत आहे सिडनी येथे १९, २० आणि २१ एप्रिल २०१९ रोजी. अडीच दिवसांच्या ह्या कार्यक्रमात भारतातल्या नामांकित व्यक्ती व कलाकार तसेच इथले स्थानिक कलाकार संगीत, नृत्य, नाटकं, प्रात्यक्षिकं, चर्चासत्र इत्यादी द्वारे रसिकांना सांस्कृतिक व वैचारिक पातळीवर एक वेगळा अनुभव देणार आहेत.

दीड हजारांहून जास्त मराठी लोकांचा सहभाग असलेले हे ऑस्ट्रेलियातील अजुनपर्यंतचे सर्वात मोठे मराठी अधिवेशन आहे.

तर मंडळी, येणार नं आमच्या सम्मेलनाला?

What is Akhil Australia Marathi Sammelan??

Marathi Association Sydney Inc. (MASI) is a non- profit association formed by people who have migrated to NSW and ACT states of Australia and who share the rich Marathi culture of Maharashtra – a state in western India. MASI’s mission is to sustain, nurture and promote Marathi culture and its heritage within the migrant community and pass this legacy to the future generations enabling them to maintain their root connections with Marathi language, history, art and cuisine. This is done by organising regular community events and cultural programs covering Marathi music, dance, drama, literature etc.

Once in every three years, Marathi people from all Australian states come together in All Australia Marathi convention – called Akhil Australia Marathi Sammelan (AAMS). AAMS convention’s main objective is to unite Marathi people from all the states to share, enrich and enjoy the Marathi cultural heritage through various entertainment programs, exchange of ideas and networking.

Under the umbrella of MASI, AAMS 2019 is being organised in Sydney on 19, 20 and 21 April 2019. It is expected that about 1500 delegates will be participating in this convention.

Come, be a part of AAMS 2019 !!